डॉ. नीलिमा गुंडी

आरपार लयीत प्राणांतिक

काव्यविषय झालेल्या विठाबाईंशी पुस्तकाच्या सुरुवातीला साधलेल्या मनोगतसदृश संवादातून कवयित्रीची लेखनामागची भूमिका लक्षात येते. संस्कृतीचा पोट-संस्कृतीशी अन्वय लावणे, तसेच जातिव्यवस्थेतल्या उतरंडीत सर्वात पायतळी ढकलल्या गेलेल्या बाईची जिद्द आणि कलेची ताकद जाणवून देणे, ही दलित-स्त्रीवादी भूमिका त्यामागे आहे.

...हिचे पांग फेडू

'भाषा आणि जीवन' या त्रैमासिकाची रौप्यमहोत्सवी वाटचाल म्हणजे मराठीच्या भाषिक-सांस्कृतिक पर्यावरणातील एक महत्त्वाची घटना आहे. १ जानेवारी १९८२ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या मराठी अभ्यास परिषदेचे हे नियतकालिक. भाषेचा विकास होण्यासाठी तिचा प्रसार होणे जसे महत्त्वाचे असते. तसेच भाषेला प्रतिष्ठा मिळण्यासाठी तिचा कस टिकवणेही गरजेचे असते. यासाठी कार्यरत राहिलेल्या 'भाषा आणि जीवन' ला महाराष्ट्र फाउंडेशनचा वैचारिक नियतकालिकाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.
२००७ मध्ये 'भाषा आणि जीवन' या त्रैमासिकाच्या पंचविसाव्या वर्षातील अंक वाचकांपर्यंत पोहोचले आहेत. 'भाषा आणि जीवन'ची ही रौप्यमहोत्सवी वाटचाल म्हणजे मराठीच्या भाषिक-सांस्कृतिक पर्यावरणातील एक महत्त्वाची घटनाच आहे.