परिषद-वार्ता

डॉ० वि०बा० प्रभुदेसाई ह्यांच्याबरोबर अनौपचारिक गप्पा

ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व नागपूर विद्यापीठाचे भूतपूर्व मराठी विभाग प्रमुख डॉ० वि०बा० प्रभुदेसाई हे मूळचे गोव्याचे व सेवानिवृत्तीनंतर मडगाव येथे स्थायिक झालेले. त्यांच्या पुण्याच्या भेटीदरम्यान मराठी अभ्यास परिषदेने दि० २ जून २०१० रोजी अनौपचारिक गप्पांचा एक कार्यक्रम आयोजित केला.

परिषदेचा वर्धापन-दिन

१ मे हा महाराष्ट्रदिन आणि मराठी अभ्यास परिषदेचा वर्धापनदिन. ह्या दोन्हीचे औचित्य साधून मराठी अभ्यास परिषदेने 'मराठी कवितेची बदलती भाषा' ह्या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता.

१३वी वार्षिक सर्वसाधारण सभा

मराठी अभ्यास परिषदेची १३वी वार्षिक सर्वसाधारण सभा १२ जुलै २००९ रोजी मुलांचे भावे विद्यालय, पेरूगेट, पुणे येथे झाली. अध्यक्षस्थानी प्रा० प्र०ना० परांजपे होते. सभेला ५२ सभासद उपस्थित होते. प्रारंभी २००८-२००९ या वर्षांतील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

भाषा आणि जीवन: