रावसाहेब काळे

प्रतिसादः वर्‍हाडी बोलीची उच्चार प्रवृत्ती

[संदर्भ : 'पूर्व खानदेशच्या बोलींचा परस्परांवर प्रभाव : एक अभ्यास' - वासुदेव सोमाजी वले, 'भाषा आणि जीवन' २६ : १ (उन्हाळा २००८)]

वले यांनी अहिराणी, वर्‍हाडी, लेवापाटीदारी, तावडी ह्या बोलींमधील साम्य दाखविताना जी उदाहरणे दिली त्यांचा वर्हा,डी बोलीसंबंधी विचार पुढीलप्रमाणे :
(१) बहिण-बहिन : वर्हा‍डीत मूर्धन्य 'ण' ऐवजी दन्त्य 'न'चा उच्चाजर होता. मात्र,
प्रमाण मराठीतील काही शब्दांत स्वरांतर्गत 'ह' आल्यास वर्हा डीत त्याचा
लोप होतो. 'बहीण' हा उच्चा्र वर्‍हाडीत 'बईन' असा आढळतो. (याप्रमाणे
तहान क तान, नाही-नाई.)
....