प्रकाश भामरे

धुळे जिल्ह्यातील दलित स्त्रियांच्या ओवीगीतांतील बहीण-भाऊ

भारतीय संस्कृतीत प्रत्येक नात्याचे विशिष्ट असे स्थान ठरलेले आहे. प्रत्येक नात्यामागे विशिष्ट भूमिका, पावित्र्य, कर्तव्य दडलेले आहे. नात्याप्रमाणे प्रत्येकाचे वर्तन संस्कृतीसंवर्धन ठरते. नातेसंबंधातील वितुष्ट संस्कृतीला लागलेले ग्रहण मानले जाते. धुळे जिल्ह्यातील दलित समाज, म्हणजेच पूर्वाश्रमीचा महार समाज लोकसंस्कृतीचा पूजक राहिलेला आहे. आधुनिक काळातसुद्धा प्रत्येक नात्यामधील संकेत हा समाज पाळताना दिसतो.

धुळे जिल्ह्यातील दलितांच्या लोकोक्ती आणि त्यांचे सामाजिक संदर्भ

खानदेशातील धुळे जिल्ह्याचा ग्रामीण परिसर म्हणजे अहिराणी बोलीचा केंद्रप्रदेश आहे. या भागात विभागानुसार ज्याप्रमाणे अहिराणी बोलीचे 'क्षेत्रीय भेद' आढळतात; त्याप्रमाणे विविध जाती-जमातींनुसार 'स्तरीय भेद'ही आढळतात. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 'महार' ही एक वैशिष्ट्यपूर्ण जात आहे. समाजात दलित किंवा पूर्वास्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या या जातीच्या लोकपरंपरा, लोकवाङ्मय, लोकबोली आपले वेगळेपण जपून आहेत....