शरदिनी मोहिते

गाथा सप्तशती'तील मराठीचे दर्शन

सातवाहन राजा हाल याने महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागातल्या कवींनी रचलेल्या हजारो गाथा गोळा केल्या. प्रसंगी त्यासाठी भरपूर धनही वेचले. कुंतल देशावर राज्य करणार्याह, स्वत: कवी असलेल्या या राजाने त्यातल्या निवडक गाथांचा संग्रह केला. ‘गाथा सप्तशती' म्हणून हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या मूळ सातशे गाथांमध्ये नंतर थोडी भर पडली, आणि १००४ गाथा ‘शेफालिका' या नावाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात अनुवादासह वाचायला मिळतात. सुमारे इ०स० २०० ते ४५० या काळात, कदाचित त्याच्याही आधीपासून बोलल्या जाणार्याव महाराष्ट्री प्राकृत भाषेतल्या या अनमोल संग्रहातून आपल्याला त्या काळच्या सामाजिक जीवनाचा परिचय तर होतोच. शिवाय ....