विजय पाध्ये

डॉ० वि०बा० प्रभुदेसाई ह्यांच्याबरोबर अनौपचारिक गप्पा

ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व नागपूर विद्यापीठाचे भूतपूर्व मराठी विभाग प्रमुख डॉ० वि०बा० प्रभुदेसाई हे मूळचे गोव्याचे व सेवानिवृत्तीनंतर मडगाव येथे स्थायिक झालेले. त्यांच्या पुण्याच्या भेटीदरम्यान मराठी अभ्यास परिषदेने दि० २ जून २०१० रोजी अनौपचारिक गप्पांचा एक कार्यक्रम आयोजित केला.

आगळा वेगळा सन्मान...

मुंबईजवळ एका गावात संगणक-चलित कापडमाग जुळवण्याचे काम चालू होते. इटालियन यंत्रतंत्रज्ञानाच्या सूचना मी आपल्या गिरणीकामगारांना हिंदी भाषेतून सांगत होतो. अवघ्या दोन दिवसांत १० कापडमाग जुळवून झाले व कापड-उत्पादन सुरू करण्याची वेळ येऊन ठेपली. इटालियन तंत्रज्ञ स्वतःवर व एका विशेष तरबेज कामगारावर इतका खूष झाला, की त्याला मागे एक लाथच मारली. परिणाम उलटा झाला. काम थांबले. हमरीतुमरीवर येऊन तो कामगार इटालियन तंत्रज्ञाशी भांडू लागला. बाकीचे त्याला सामील झाले. 'माध्यम' आणि 'मध्यस्थ' या दोन्ही भूमिका करून मी ते भांडण सोडवले. उत्पादन सुरू झाले, तशी तो इटालियन गाऊ, नाचू लागला, टाळ्या पिटू लागला. मी त्याच्यापासून दहा पावले दूर सरकलो व टाळ्या पिटू लागलो. काही इटालियन लाथ मारून कौतुक करतात, हे नवीन ज्ञान मला झाले होते.

- य०चिं० देवधर (डॉ० कल्याण काळे व डॉ० अंजली सोमण संपादित 'भाषांतरमीमांसा' ह्या पुस्तकातून)