कालेलकर पुरस्कार

प्राध्यापक ना॰ गो॰ कालेलकर भाषा विषयक लेखन पुरस्कार २०२१चे वितरण

मराठी अभ्यास परिषदेच्या प्राध्यापक ना॰ गो॰ कालेलकर भाषा विषयक लेखन पुरस्कार २०२१चे वितरण नुकतेच पुणे येथे पार पडले. पुरस्कारित लेखिका डॉ॰ सुहासिनी पटेल यांना हा पुरस्कार श्री॰ खंडेराव कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला.

मराठी अभ्यास परिषद: 

प्रा० ना० गो० कालेलकर पुरस्कार सन २०२१ साठी आवाहन

'मराठी अभ्यास परिषद' ही मराठी भाषकांमध्ये भाषिक सजगता निर्माण करणारी संस्था असून ती १९८२ पासून कार्यरत आहे. दर वर्षी नियमितपणे, मराठी भाषेच्या हिताच्या आणि समृद्धीच्या अनुषंगाने पूरक ठरणाऱ्या कार्यशाळा, व्याख्याने, परिसंवाद, अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करणे तसेच इतरत्र होणाऱ्या अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे काम संस्था करते. संस्थेतर्फे ‘भाषा आणि जीवन’ नावाचे त्रैमासिकही प्रकाशित केले जाते. अशाप्रकारे भाषाचिंतनाला वाहिलेले, इतक्या प्रदीर्घ काळ प्रकाशित होणारे भारतीय भाषांमधले हे एकमेव भाषाभ्यासविषयक नियतकालिक आहे. नुकताच परिषदेला राज्य शासनाचा 'अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार'ही मिळाला आहे.

मराठी अभ्यास परिषद: