प्रा॰ ना॰ गो॰ कालेलकर पुरस्कार सन २०१८ साठी आवाहन

सप्रेम नमस्कार

मराठी अभ्यास परिषद ही मराठी भाषकांमध्ये भाषिक सजगता निर्माण करणारी संस्था असून ती १९८२ पासून गेली बत्तीस वर्षे कार्यरत आहे. दर वर्षी नियमितपणे, मराठी भाषेच्या हिताच्या आणि समृद्धीच्या अनुषंगाने पूरक ठरणाऱ्या कार्यशाळा, व्याख्याने, परिसंवाद, अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करणे किंवा त्यात सहभागी होण्याचे काम संस्था करते. संस्थेतर्फे ‘भाषा आणि जीवन’ नावाचे त्रैमासिकही प्रकाशित केले जाते. अश्याप्रकारे भाषाचिंतनाला वाहिलेले इतक्या प्रदीर्घ काळ प्रकाशित होणारे भारतीय भाषांमधले हे एकमेव भाषाशास्त्रीय नियतकालिक आहे.

निमंत्रण पत्रिका महाबँक पुरस्कार कार्यक्रम २०१२

शनिवार, दि. २१ जानेवारी २०१२ ला सायंकाळी ठीक ५.३० वाजता धन्वंतरी सभागृह,पटवर्धन बाग, पुणे येथे

मराठी अभ्यास परिषदेचे सर्व सभासद आणि अन्य मान्यवर,

यावर्षीच्या महाबॅंक पुरस्कारासाठी माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘लिहावे नेटके’ (ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे) या पुस्तकाची निवड केली आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवार, दि. २१ जानेवारी २०१२ ला सायंकाळी ठीक ५.३० वाजता धन्वंतरी सभागृह,पटवर्धन बाग, पुणे येथे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री. रमेश पानसे यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाला आपण अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती.
सोबत - निमंत्रण पत्रिका पाठवत आहे.

आवाहन, लेखकांसाठी सूचना, परीक्षणासाठी आलेली पुस्तके


आवाहन

टपालाने पाठविलेल्या अंकांतील काही अंक गहाळ होतात, हा नेहमीचा अनुभव आहे. शक्यतो अंक पुन्हा पाठविला जातो. पण जेव्हा या तक्रारींची संख्या जास्त असते तेव्हा अंक पुन्हा पाठवणेही कठीण होते. पुण्याच्या काही भागांतून - विशेषत: बिबवेवाडी, सिंहगड मार्ग - या भागांतून तक्रारी खूप येतात. यामुळे अंकाची प्रत व टपालखर्च असे दुहेरी नुकसान होते. म्हणून जे सभासद/वर्गणीदार/कुरियर-सेवेचे वर्षाला ` ४०/- पाठवतील त्यांना अंक कूरियर-सेवेने पाठविला जाईल. ही व्यवस्था हिवाळा २०११ (जानेवारी २०११) अंकापासून करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी.

लेखकांसाठी सूचना

पानपूरके

भाषा प्रयोगातील दोन प्रवृत्ती
भाषाशक्तीचा आविष्कार भाषा प्रयोगात होतो तेव्हा त्यात दोन प्रवृत्ती दिसून येतात. एक प्रवृत्ती असते ती समाजजीवनातील निरनिराळी रूपे आणि अनेक विभाजने यांच्यामुळे भाषाव्यवस्थेत येणार्‍या विविधतेची, विकेंद्रीकरण होण्याची, भाषाप्रयोगात जीविकागत, प्रदेशगत आणि पिढीगत भेद निर्माण होण्याची आणि भाषांची विविधता कायम राहण्याची. याउलट दुसरी प्रवृत्ती आहे ती परिष्करणाची, प्रमाणीकरणाची, स्थिरीकरणाची, एकरूपतेची. विविध प्रकारच्या जीविका, प्रदेश, पिढ्या जोडण्याची प्रेरणा, प्रबळ केंद्र निर्माण करण्याची प्रेरणा येथे सक्रिय होताना दिसते.

लेखक-परिचय


आचार्य, (प्रा०) माधव नारायण :
एम०ए०, मराठीचे निवृत्त प्राध्यापक. ‘अनुषंग’ (१९८१), ‘मराठी व्याकरण विवेक’ (१९९०, २००१), (महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक), ‘ज्ञानमयूरांची कविता’ (१९९३), ‘आर्याभारत : नवदर्शन’ (१९९७), ‘पञ्चपदवी ज्ञानदेवी’ (२००३), ‘ध्वनितांचे केणें’ (२००८) ही पुस्तके प्रकाशित. ‘मोरोपंतांची सतीगीते’ (१९८५, १९९४), ‘मोरोपंत विरचित संशयरत्नावली (१९८५), ‘मोरोपंतकृत श्लोककेकावली’ (१९९४) या पुस्तकांचे संपादक. पैकी शेवटच्या पुस्तकास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे पारितोषिक. ‘पञ्चपदवी ज्ञानदेवी’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासन पुरस्कार व संत साहित्य पुरस्कार. ‘ध्वनितांचे केणें’ या ग्रंथाला मराठी अभ्यास परिषदेचा पुरस्कार.

Pages