१३वी वार्षिक सर्वसाधारण सभा

1. मराठी अभ्यास परिषदेची १३वी वार्षिक सर्वसाधारण सभा १२ जुलै २००९ रोजी मुलांचे भावे विद्यालय, पेरूगेट, पुणे येथे झाली. अध्यक्षस्थानी प्रा० प्र०ना० परांजपे होते. सभेला ५२ सभासद उपस्थित होते. प्रारंभी २००८-२००९ या वर्षांतील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. चिटणीस प्रा० आनंद काटीकर यांनी २००८-०९ या वर्षाचे कार्यवृत्त सादर केले. कोषाध्यक्ष श्रीमती विजया चौधरी यांनी लेखापरीक्षकांच्या अहवालासह वार्षिक ताळेबंद व पुढील वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले. पुढील वर्षासाठी लेखापरीक्षकांची व कायदेविषयक सल्लागारांची नेमणूक करण्याबद्दलचा प्रस्ताव संमत करण्यात आला. तरुण मराठी भाषकांमध्ये मराठीबद्दल आस्था निर्माण करण्याची व त्यांना संस्थेकडे आकर्षित करण्याची आवश्यकता असल्याचे प्रा० परांजपे यांनी सांगितले. त्यासाठी 'भाषा आणि जीवन'च्या वार्षिक वर्गणीत विद्यार्थ्यांना सवलत देण्याची कल्पना मांडली. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्याख्याने व चर्चासत्रे आयोजित करणे, स्पर्धा घेणे इत्यादि सूचनाही करण्यात आल्या. त्याबद्दल कार्यकारिणीने निर्णय घ्यावा असे ठरले. शेवटी अध्यक्षांचे आभार मानून सभेचा समारोप झाला.
2. संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पुढील आजीव सभासदांनी आपली उर्वरित वर्गणी (किंवा अधिक रक्कम) पाठवली. संस्था त्यांची आभारी आहे : सर्वश्री ब०के० काळे (पुणे), बा०ग० भाटवडेकर (बडोदे), श्रीनिवास पंडित (मुंबई), माधव ना० आचार्य (चौल), बाबा भांड (औरंगाबाद), दीपक घारे (डोंबिवली), जाई निंबकर (फलटण), चंद्रकांत मर्गज (मुंबई), म०सु० पाटील (मुंबई)
3. परिषदेला देणग्या : परिषदेला पुढील व्यक्तींनी दिलेल्या देणग्यांबद्दल परिषद त्यांची ऋणी आहे.

श्रीमती लीला पाटील : रु० ४०००/-
श्रीमती रमा राऊळ : रु० ३९००/-
(परिषदेला दिलेल्या देणग्यांना आयकरातून सूट मिळते.)

4. चुकीची दुरुस्ती : 'भाषा आणि जीवन'च्या २७-३ (पावसाळा ०९) अंकात पृष्ठ५वरील चौकटीच्या शीर्षकात 'अस्मिता'ऐवजी 'अस्तिमा' असा मुद्रणदोष राहून गेला आहे. क्षमस्व.

भाषा आणि जीवन: