पावसाळा २०१०

‘म्हणून’ची चूक

उज्ज्वला जोगळेकर यांनी ‘उच्चारणातून व्यक्त होणारे संयुक्त तर्कसूचक अव्ययांचे ‘अर्थ’कारण’ (भाषा आणि जीवन वर्ष २८ अंक १ हिवाळा २०१०) या लेखात ‘म्हणून’, ‘म्हणून तर’, ‘म्हणून तरी’, ‘काही’ या उभयान्वयी अव्ययांच्या उपयोगाची अनेक उदाहरणे दिली आहेत. हा लेख त्यांच्या व्यासंगाची साक्ष पटवतो.

प्रादेशिक भाषांना न्यायालयीन भाषा म्हणून मान्यता द्या - सर्वोच्च न्यायालयात याचिका

ज्याप्रमाणे लोकसभेत तात्काळ भाषांतर ऐकू येण्याच्या व्यवस्थेमुळे तमीळ व इतर प्रादेशिक भाषा वापरता येतात त्याप्रमाणे उच्च व सर्वोच्च न्यायालयांतही प्रादेशिक भाषांचा वापर करणे शक्य आहे का ह्याचा अभ्यास करण्याचा आदेश केंद्र सरकारला देण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

मराठी अभ्यास परिषद: 

अरबी - मराठी

सुरुवातीच्या दिवसांत एकदा मी बायकांच्या ओपीडीत एका पेशंटला तपासलं. त्यानंतर ती कपडे, अबाया चढवत होती. खुर्चीवर काढून ठेवलेल्या तिच्या काळ्या शेल्याकडे बोट दाखवून ती मला म्हणाली,

"आतोनी शेला. (दे मला शेला)"

हिंदीचे अतिक्रमण आता मराठीच्या पाठयपुस्तकातही!

आज इंग्रजीपेक्षा हिंदीचे मराठी भाषेवरील आक्रमण हा खरा कळीचा मुद्दा आहे. प्रसार माध्यमातून मराठी मुलांवर हिंदी शब्दांचा अव्याहत मारा चालू असतो. त्यामुळे हिंदी शब्दांचा चुकीचा अर्थ लावून मराठी मुले मराठी भाषा बोलत आहेत.

‘ण’ की ‘प’?

आमच्या मालवणी प्रकारच्या माशांच्या आमटीची कृती एका मित्राला सांगत असताना एक गंमत लक्षात आली. मी सांगत होते, "वाटपात अमुक अमुक घालायचं... मग वाटप उकळायचं..."तर तो अडवून म्हणाला, "वाटप काय वाटप? वाटण म्हणायचंय ना तुला?" एक क्षण मला गोंधळायला झालं.

संगणकव्यवहाराचे मराठीकरण

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेबरोबरच उत्पादनांच्या स्थानिकीकरणाची संकल्पनाही महत्त्वाची ठरते. किंबहुना ह्या दोन्ही प्रक्रिया एकमेकींशी नाते राखणार्‍या आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जगातील एका टोकाला असलेली वस्तू जगाच्या दुसर्‍या टोकाला सहज उपलब्ध होऊ लागली आहे. पण त्याबरोबरच जगाच्या त्या टोकाला ती वस्तू पुरवताना तिथल्या स्थानिक आवश्यकता काय आहेत हेही ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे ह्याचे भान आता येऊ लागले आहे. संगणकक्षेत्रातही ह्या स्थानिकीकरणाला विशेष महत्त्व लाभले आहे.

मेकॉले विरुद्ध प्रिन्सेप, प्रिन्सेप विरुद्ध ट्रेवेल्यन

१८३४ सालचा हिंदुस्थान. दुसर्‍या बाजीरावाला बिठूरास पेन्शनवर पाठवल्यानंतर ब्रिटिश सत्ता हिंदुस्थानात सुस्थापित झाल्यासारखी दिसत होती. पुष्कळ भागात प्रत्यक्ष सत्ता आणि उर्वरित भागात ताटाखालची मांजरे बनलेले राजे-महाराजे आणि नवाब ह्यांमुळे एक उद्धट आत्मविश्वास सत्ताधारी वर्गामध्ये निर्माण झाला होता. युरोपीय (विशेषेकरून ब्रिटिश) संस्कृती, ज्ञान, समाज आणि वंश (तेव्हाचा शब्द, आजचा नव्हे) हे हिंदुस्थानी संस्कृती, ज्ञान, समाज आणि वंश ह्यांपेक्षा गुणत: श्रेष्ठ आहेत अशी भावना सत्ताधारी वर्गामध्ये दृढमूल होऊ लागली होती.

धुळे जिल्ह्यातील दलित स्त्रियांच्या ओवीगीतांतील बहीण-भाऊ

भारतीय संस्कृतीत प्रत्येक नात्याचे विशिष्ट असे स्थान ठरलेले आहे. प्रत्येक नात्यामागे विशिष्ट भूमिका, पावित्र्य, कर्तव्य दडलेले आहे. नात्याप्रमाणे प्रत्येकाचे वर्तन संस्कृतीसंवर्धन ठरते. नातेसंबंधातील वितुष्ट संस्कृतीला लागलेले ग्रहण मानले जाते. धुळे जिल्ह्यातील दलित समाज, म्हणजेच पूर्वाश्रमीचा महार समाज लोकसंस्कृतीचा पूजक राहिलेला आहे. आधुनिक काळातसुद्धा प्रत्येक नात्यामधील संकेत हा समाज पाळताना दिसतो.

बोलींचा अभ्यास

पुस्तकाचे लेखक डॉ० कैलास सार्वेकर जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मराठीचे प्रपाठक आहेत. त्यांनी ग्रामीण कविता या विषयावर पीएचडी केली आहे. ते पंचवीस वर्षे नवापुरच्या आदिवासी शिक्षणसंस्थेच्या महाविद्यालयात मराठीचे अध्यापक होते. तेव्हा त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिक्षणाची गोडी लावण्यासाठी खास प्रयत्न आणि प्रयोग केले. गेल्या सुमारे वीस वर्षांत त्यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख या पुस्तकात संग्रहित केले आहेत.

बदलणारी मराठी भाषा

भाषा दर १० कोसांवर बदलते असे मानतात; तशी ती दर दहा वर्षांनीही बदलते हे का बरे मांडले जात नाही? काळ जसा प्रवाही आहे तशी भाषाही प्रवाही आहे. त्यामुळे जुने रीतीरिवाज, संस्कृती, शिक्षणपद्धती, परिमाणे इ० बदलतात तसतशी जुनी भाषा कालबाह्य होते आणि त्यात आता बदलत्या तंत्रज्ञानाचा झपाटा आला आहे. त्यामुळे ही भाषा बदलते आहे.

Pages