उद्दिष्टे आणि उपक्रम

संस्थेची उद्दिष्टे: 

(१) मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे.
(२) लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे.
(३) ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.
(४) मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे 
(५) मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे.
(६) लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे.
(७) ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.
(८) मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे

संस्थेचे उपक्रम: १

मराठी अभ्यास परिषद पत्रिका : भाषा आणि जीवन त्रैमासिक
१९८३ पासून नियमितपणे प्रकाशित.
महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (१९९५) प्राप्त झालेले नियतकालिक.
मराठी ज्ञानक्षेत्रात प्रतिष्ठा लाभलेले त्रैमासिक.
भाषेला वाहिलेले व इतक्या दीर्घकाळ प्रकाशित होत असलेले भारतीय भाषांतील एकमेव
नियतकालिक.
भाषाविषयक सैद्धांतिक विचारविमर्श.
भाषांतरित साहित्याची चिकित्सा.
भाषा आणि जीवन यांतील अनेकपदरी संबंधांची निरीक्षणे आणि त्यावरील भाष्य
अनेक चुरचुरीत सदरे व पानपूरके.

वार्षिक वर्गणी
(व्यक्तीसाठी) रू. १००/-, संस्थेसाठी रू. १२५/-

पंचवार्षिक वर्गणी
(व्यक्तीसाठी) रू. ४५०/-, संस्थेसाठी रू. ५५०/-

संस्थेचा उपक्रम : २

प्रा० ना० गो० कालेलकर भाषाविषयक लेखन पुरस्कार
कोश, बोलीभाषा, अन्य भाषारूपे यांचा अभ्यास, भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास इत्यादी
क्षेत्रांतील लेखनाला दरवर्षी पुरस्कार.

पुरस्काराने सन्मानित काही मान्यवर :
डॉ० नरेश नाईक, श्री० रमेश पानसे, प्रा० अशोक केळकर, प्रा० कृ० श्री० अर्जुनवाडकर, डॉ०
हरिश्चंद्र बोरकर, डॉ० द. दि. पुंडे, पं. वामनशास्त्री भागवत, शं० गो० तुळपुळे, ऍन फेल्डहाऊस,
डॉ. सदाशिव देव, प्रा० वसंत आबाजी डहाके, माधुरी पुरंदरे, द० न० गोखले, डॉ० मिलिंद मालशे.

संस्थेचे उपक्रम : ३

१ मे हा परिषदेचा वर्धापनदिन असतो. त्या निमित्ताने परिषदेतर्फे व्याख्यान, चर्चासत्र किंवा
परिसंवाद यांसारखा कार्यक्रम आयोजित केला जातो.

२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने नामवंत भाषातज्ञ
‘श्रीमती सत्वशीला सामंत स्मृती व्याख्यान’ आयोजित केले जाते.

भाषाविषयक लेखन पुरस्कार प्रदान करण्याच्या निमित्तानेही परिषदेतर्फे दर वर्षी एक कार्यक्रम
आयोजित केला जातो. या कार्यक्रमात निवड समितीची भूमिका मांडणारे परीक्षकांचे मनोगत,
पुरस्कृत व्यक्तीचे मनोगत आणि अन्य प्रमुख वक्ते यांची भाषणे होतात.

संस्थेचे उपक्रम : ३

चर्चासत्रांचे आयोजन

भाषाविषयक प्रश्नांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण व आकलन यासाठी चर्चासत्रे, व्याख्याने. उदा.
त्रिभाषा-सूत्राचे मूल्यमापन
भाषिक नीती आणि व्यवहार
प्रसार-माध्यमे आणि मराठीचा विकास
पाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन

पत्रव्यवहारासाठी पत्ता
मराठी अभ्पास परिषद
बी ५ / १६ सनसिटी, सिंहगड रस्ता, आनंदनगर, पुणे ४११०५१.

चलभाष : 94216 10704, 9422511238, 9822031963

ईपत्ता : marthi.abhyas.parishad@gmail.com